जनार्दन ओक Published By : mhnmk.com (⏱ 4 Jul, 2017) वाचकप्रिय लेखक म्हणजे जनार्दन ओक. त्यांची आजवर सव्वाशे पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत आणि सध्या दहा प्रकाशनाच्या मार्गावर आहेत. त्यांच्या बऱ्याच पुस्तकांच्या सध्या दुसऱ्या-तिसऱ्या आवृत्त्या चालू आहेत. प्रकाशक त्यांच्या नवीन पुस्तकाकडे डोळे लावून बसलेले असतात. यावरून त्यांच्या वाचकप्रियतेची कल्पना यावी. लेखनाच्या प्रश्नंतातलं हे सर्व यश त्यांनी वयाच्या ५०व्या वर्षी लेखनाला सुरुवात करून, गेल्या २३ वर्षांत कमावलं आहे, हे त्यांचं अजून एक वैशिष्टय़. मुळात जनार्दन ओक लेखक बनले कसे हीसुद्धा एक मोठी चित्तरकथा आहे. सामान्य माणसांचे ठोकळेबाज नियम कलंदर वृत्तीच्या मनस्वी कलाकारांना लागू होत नाहीत. जनार्दन ओकांच्या बाबतीतही तसेच म्हणावे लागेल. त्यांच्या साहित्याप्रमाणेच त्यांचं आयुष्यही अनेक अतक्र्य, चित्रविचित्र घटनांनी भरलेलं आहे. ओक मूळचे बदलापूरचे. बदलापूर गावात मोठा ओक वाडा आहे. त्यांचे वडील श्रीकृष्ण पांडुरंग ओक स्वातंत्र्यसैनिक होते. त्यांना ‘बदलापूरचे गांधी’ म्हणून ओळखले जाई. स्वातंत्र्यलढय़ात प्रत्येक आंदोलनात भाग घेतल्याबद्दल त्यांना अगणित वेळा तुरुंगवास भोगावा लागला. हे ओक कुटुंब आर्थिकदृष्टय़ाही मोठे संपन्न आणि रसिक होते. घरची भरपूर शेती, दुभती जनावरं होती. नोकर होते. जनार्दन ओक लहानपणी शाळेत जायचे तेव्हा दप्तर घ्यायला सोबत एक गडी असायचा. ओकांचे वडील मोठे रसिक होते. त्यांच्याकडे मोठा ग्रंथसंग्रह होता. संगीत नाटकांचे प्रयोग त्यांच्या वाडय़ावर होत. जनार्दन ओकांनी लहानपणीच चार आणे मालावाल्या अर्नाळकरांच्या कादंबऱ्या, फडके, खांडेकर, माडखोलकर, र.वा. दिघे हे लेखक वाचून काढले. अर्नाळकरांच्या कादंबऱ्या वाचून लहानपणापासून त्यांचा ओढा गूढ-रहस्यमय कादंबऱ्या लिहिण्याकडे होता. लहानपणी ते एक हस्तलिखित मासिकही काढीत. अशा संपन्न बालपणानंतर त्यांना जीवनाच्या दुसऱ्या काळ्याकुट्ट बाजूचे भयाण दर्शन घडले. १९५३ साली त्यांचे वडील वारले. शेती लुबाडली गेली. नातेवाईक बदलले आणि ओक कुटुंब उघडय़ावर पडले. नातेवाईकांकडे राहून शिक्षण घ्यायची वेळ त्यांच्यावर आली. जेमतेम अकरावी मॅट्रिकपर्यंत ते शिकू शकले व घराला आधार देण्यासाठी त्यांना नोकरी धरावी लागली. १९११ साली लोकशिक्षण नावाचे मासिक काढले. १९१७ मधील 'थ्री डिव्हिजन्स ऑफ महाराष्ट्र' या लेखात मराठी लोक हे मुंबई, महाराष्ट्र, विदर्भ, हैदराबाद व गोवा येथे पसरले आहेत, त्या सर्वांचा मिळून महाराष्ट्र व्हायलाच पाहिजे असे प्रतिपादन श्री. विठ्ठल वामन ताम्हणकरांनी केले .श्री. जनार्दन विनायक ओक यांना या लेखाचे महत्त्व खूप पटले व त्यांनी त्यांच्या 'लोकशिक्षण'मधून याचा वेळोवेळी पाठपुरावा करावयास सुरुवात केली. साहित्य : •शंकारी •राणा शेगावीचा •देवांगना •नरकेसरी 0 Votes have rated this Naukri. Average Rating is 0