ऐश्वर्य पाटेकर कवी Published By : mhnmk.com (⏱ 4 Jul, 2017) ऐश्वर्य पाटेकर (जन्म - १४ एप्रिल, १९७७ हयात) हा त्याच्या 'भुईशास्त्र' या पहिल्याच काव्यसंग्रहासाठी मराठी साहित्यासाठीचा पहिला साहित्य अकादमी युवा पुरस्कार मिळालेला कवी आहे. ऐश्वर्य नामदेव पाटेकर यांचा जन्म महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्याच्या चांदवड तालुक्यातील पाटे या खेडेगावात एका शेतकरी कुटुंबात झाला. त्याच्या घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची होती. नामदेव आणि इंदूबाई या दांपत्याला ऐश्वर्य हा मुलगा आणि चार मुली होत्या. आपल्या वडिलांकडून आईला होणारी मारहाण आणि तिचे आक्रंदन ऐश्वर्यला लहानपणीच अनुभवायला मिळाले. शेवटी बडिलांनी दुसरे लग्न केले आणि ऐश्वर्याला आणि त्याच्या आईला घराबाहेर काढले. आईने मोलमजुरी करून मुलांना वाढविले. ऐश्वर्य पाटेकर यांचे प्राथमिक शिक्षण गावातच झाले. प्राथमिक शाळेत चौथीच्या वर्गात असताना त्यांचे शिक्षक श्री. पवार यांनी ’प्रेरणा’ नावाचे हस्तलिहित काढायचे ठरविले. दहा वर्षे वयाच्या ऐश्वर्यने त्यासाठी स्वतः लिहिलेल्या कविता दिल्या असता त्या कविता ऐश्वर्यने लिहिलेल्या आहेत यावर शिक्षकांचा विश्वास बसला नाही, म्हणून त्यांनी त्या कविता नाकारल्या होत्या. पाटेकरांचे माध्यमिक शिक्षण काझीसांगवी येथे तर महाविद्यालयीन शिक्षण लासलगाव आणि नाशिक येथे झाले. एम.ए., बी.एड., एम.फिल. पदव्या मिळाल्यावर पाटेकर इ.स. २००४ पासून निफाड तालुक्यातील काकासाहेबनगर येथील कर्मवीर काकासाहेब वाघ महाविद्यालयात मराठीचा व्याख्याता म्हणून लागले. तेथे असताना ऐश्वर्य पाटेकर यांनी ’भुईशास्त्र’ हा काव्यसंग्रह लिहिला. कवी ऐश्वर्य पाटेकर यांच्या ‘जू..’ या आत्मकथनाला वडशिवणे (ता. करमाळा) येथील विश्वकर्मा तरुण मित्रमंडळातर्फे देण्यात येणारा ‘गावगाडा’ साहित्य पुरस्कार जाहीर झाला आहे. रोख ५,५०१ रुपये, सन्मानचिन्ह, सन्मानपत्र शाल, श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. निवड समितीतील ज्येष्ठ साहित्यिकांनी एकमताने या पुरस्कारासाठी ‘जू..’ या आत्मकथनाची निवड केली आहे. ऐश्वर्य पाटेकर यांचा भुईशास्त्र हा कवितासंग्रह आहे. शिवाय ’कवितारती’, आणि ’अनुष्टुभ’ यांसारख्या अनेक नियतकालिकांतून त्यांच्या कथा प्रकाशित झाल्या आहेत. पुरस्कार : •भुईशास्त्र या काव्यसंग्रहासाठी साहित्य अकादमी युवा पुरस्कार[६] - साहित्य अकादमीच्या सांस्कृतिक मंडळातर्फे. (इ.स. २०१२) •यशवंतराव चव्हाण साहित्य पुरस्कार[७][८] - पुणे येथील प्रकाश ढेरे चॅरिटेबल ट्रस्ट व गंगा लॉज मित्रमंडळातर्फे उत्कृष्ट साहित्यनिर्मितीसाठी. (इ.स. २०१२) •रा. ना. पवार साहित्य पुरस्कार[९] - सोलापूर येथील रा.ना. पवार प्रतिष्ठानतर्फे उत्कृष्ट वाङ्मय निर्मितीसाठी. (इ.स. २०११) •संत भगवानबाबा काव्यसंग्रह पुरस्कार [१०] - वर्धा येथील यशवंतराव दाते स्मृती संस्थेद्वारे. (इ.स. २०१२) •सुजाता पाबरेकर स्मृती पुरस्कार •आनंद जोर्वेकर स्मृती पुरस्कार[११] - (इ.स. २०००) •कवी गोविंद पुरस्कार - सार्वजनिक वाचनालय नाशिक यांचेकडून (इ.स. १९९९) •संजय कोरंबे स्मृती पुरस्कार - जालना (इ.स. १९९९) •रेव्हरंड टिळक पुरस्कार - नाशिक (इ.स. २००९) •त्यांच्या ’बाप’ या कथेस इ.स. २००० साली सकाळच्या दिवाळी अंक कथालेखन स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळाला होता. 0 Votes have rated this Naukri. Average Rating is 0