फुफ्फुसांचे आजार Published By : mhnmk.com (⏱ 3 Jul, 2017) फुफ्फुसांच्या आजाराने त्रासलेले लक्षावधी नवे रुग्ण दरवर्षी आढळतात, ज्या व्यक्तींच्या आजाराबद्दल माहिती नाही अशांची संख्या वेगळीच. फुफ्फुसांच्या आजाराची विशिष्ट लक्षणे असतात. मुख्य लक्षणे आणि त्यांचा तपशील खाली दिला आहे. फुप्फुसांमध्ये हवा पोहोचण्यास अडथळा निर्माण होतो. तेव्हा क्रॉनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मनरी डिसिज होतो. निदान वेळेत झालं नाही तर यामुळे श्वासाला अडथळा निर्माण होऊन त्यापासून बचाव करणे कठीण होऊन बसते. हा वाढणारा आजार असून तो जुना झाल्यास घातक ठरतो. हा पूर्णत: बरा होत नाही पण त्याच्यावर नियंत्रण मिळवणं शक्य होतं. कारणे : •हा विशेष करून प्रदूषणामुळे होताना दिसतो. सीओपीडीचे मुख्य कारण म्हणजे तंबाखूचा धूर (यामध्ये दुस-याने केलेले धूम्रपानही समाविष्ट आहे). अन्य धोकादायक घटकांमध्ये खालील गोष्टींचा समावेश आहे – •घरांतील प्रदूषण (उदा. ग्रामीण भागातील चुलीवरील स्वयंपाकामुळे निर्माण होणारा धूर आणि उष्णता) •बाहेरील प्रदूषण •कामाच्या ठिकाणची धूळ आणि रसायने (वाफा किंवा त्रासदायक घटक किंवा ज्योती) •लहानपणात सातत्याने होणारे श्वसनाचे आजार •अयोग्य पद्धतीने दम्यावर उपचार झाल्यास त्यांतूनही सीओपीडी होऊ शकतो. विशेषकरून वय र्वष ४०च्या पुढे हे होऊ शकते, पण कित्येक परिवारात हे वय ३५ वर्षावरही दिसून येते. धूम्रपान करणारे आणि धूम्रपान न करणारे यांनाही सीओपीडीचा धोका अधिक दिसून येतो. याचं मुख्य कारण म्हणजे शहरांतील प्रदूषण तर गामीण भागातील बायोमास इंधनाचा वापर होय. •हा आजार पुरुष आणि स्त्रिया या दोघांमध्येही अधिक प्रमाणात दिसून येतो. शहरी महिलांमध्ये गेल्या पाच-सहा वर्षामध्ये धूम्रपानाची सवय वाढू लागली आहे. परिणामी हे काळजीचं कारण बनलं आहे. त्याचबरोबर हाय कोलेस्ट्रॉल, मधुमेह, हृदयरोग आणि ऑस्ट्रिओस्पोरोसिसमुळेही नंतर सीओपीडी होऊ शकतो. म्हणूनच सीओपीडी हा अधिक धोकादायक ठरतो उपचार : •याच्या लक्षणांवर नियंत्रण मिळवण्यासाठी तसेच आयुष्याची गुणवत्ता वाढवण्यासाठी अनेक उपचार उपलब्ध आहेत. रुग्णांना ब्राँकोडिलेटर्स म्हणजेच चांगली इन्हेलर्स तसेच तोंडातून दिली जाणारी औषधे यामुळे फुप्फुसांपर्यंत हवा पोहोचवण्यासाठी पयत्न केले जातात. •रुग्णाच्या स्थितीनुसार त्यांच्या श्वासाची क्षमता वाढवण्यासाठी फिजिओथेरपी, न्यूट्रिशिअन किंवा प्रोटिनचे पदार्थ यांचे उपचार केले जातात. परिणामी आयुष्याची गुणवत्ता सुधारते. कधी कधी रुग्ण हे औषधं किंवा इन्हेलरचा उपाय करून लवकर आराम मिळवतात. जे व्यायामामुळे लवकर शक्य नसते. •भारतात सीओपीडीवर नियंत्रण मिळवण्यासाठी धूम्रपानाविषयी जागरूकता निर्माण करण्याबरोबरच जागतिक स्तरावरील घातक अशा या आजाराविषयी माहिती देणे आवश्यक असते. ग्रामीण भारतात अनारोग्यपूर्ण पर्यावरण, विशेष करून गरीब लोकांना हा धोका असतो तर शहरी भागात तंबाखूच्या सवयी, अनारोग्यपूर्ण भोजन आणि व्यायाम नसणे यांमुळे अपमृत्यू तसेच टाळता येणाऱ्या अशा आजारांवर उपचार करणे शक्य होते. 0 Votes have rated this Naukri. Average Rating is 0