प्रधानमंत्री जीवनज्योती वीमा योजनाविषयी माहिती Published By : mhnmk.com (⏱ 3 Mar, 2017) प्रधानमंत्री जीवनज्योती वीमा योजना नियमावली योजनेची माहिती : या वीमा योजनेअंतर्गत प्रत्येक वर्षी नूतनीकरण करता येणारी, एक वर्षाचे सुरक्षाकवच देणारी आणि कोणत्याही कारणाने विमाधारकाचा मृत्यू झाल्यास जीवन वीमा कवच देण्यात येते. या योजनेचे व्यवस्थापन भारतीय जीवन वीमा निगम अर्थात एलआयसीच्या माध्यमातून केले जाणार आहे. तसेच, इतर जीवन विमा कंपन्यादेखील आवश्यक ती परवानगी घेऊन इतर बँकांशी संलग्न होऊन योजनेच्या सुविधा प्रदान करू शकतात. तसेच, बँकादेखील आपल्या ग्राहकांना विमासुरक्षा प्रदान करण्यासाठी इतर जीवन विमा कंपन्यांसोबत संलग्नित होऊन योजनेच्या सुविधा देऊ शकतात. विमा कव्हरेजच्या मर्यादा : योजनेत सहभागी बँकांच्या १८ ते ५० वर्षे वयोगटातील सर्व खातेधारक या योजनेतून विमा सुरक्षा कवच मिळवू शकतात. जर एखाद्या व्यक्तिचे एकाच बँकेत एकपेक्षा जास्त qकवा विविध बँकामध्ये अनेक बचत खाती असतील तर तो व्यक्ती एकाच बचत खात्याच्या माध्यमातून ही सुविधा स्विकार करू शकतो. बँकेतील खात्यासाठी आधार कार्ड ही प्राथमिक ‘के.वाय.सी.ङ्क अर्थात ग्राहकाची आवश्यक माहिती असणार आहे. नामांकनाचा कालावधी : सुरुवातीला १ जून २०१५ ते ३१ मे २०१६ पर्यंतच्या कव्हर कालावधीसाठी ३१ मे २०१५ पर्यंत नामंकन भरावयाचे आहे. तसेच, स्वत:च्या नावे सहमती द्यावी लागेल. संभावित कव्हरसाठी उशिरा नामंकन भरण्यासाठी ३१ ऑगस्ट २०१५ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली असून त्याचा कालावधी भारत सरकारद्वारे आणखी तीन महिन्यांसाठी अर्थात ३० नोव्हेंबर २०१५ पर्यंत वाढवला जाऊ शकतो. यानंतर, ज्यांना या योजनेचा लाभ घ्यावयाचा आहे ते नागरिक पूर्ण वार्षिक प्रिमीयमसह निर्धारीत अर्जात आपण स्वस्थ आणि निरोगी असल्याचे स्व-प्रमाणपत्र सादर करून संभावित कव्हर मिळवू शकतो. नामनिर्देशाची साधने : योजनेअंतर्गत मिळणारे विम्याचे कवच १ जून ते ३१ मे दरम्यान एका वर्षासाठी राहणार असून त्यात सहभागी होण्यासाठी, नोदणी केलेल्या बचत खात्यातून नामांक आणि प्रिमीयमचा भरणा करण्यासाठी निर्धारीत प्रपत्र दरवर्षी ३१ मेपर्यंत प्रारंभिक वर्षासाठी वर सांगितलेल्या अपवादांसोबत विकल्प प्रस्तुत करणे आवश्यक आहे. संभावित कव्हरसाठी विलंबित नामांकन पूर्ण वार्षिक प्रिमीयम भरण्यासोबत निरोगी असल्याचे स्व-प्रमाणपत्र सादर केल्यास शक्य आहे. - या योजनेतून बाहेर पडणारा व्यक्ती भविष्यात केव्हाही निर्धारीत वेळी, निर्धारीत कागदपत्रांची पूर्तता आणि निरोगी असल्याचे स्व-प्रमाणपत्र भरून या योजनेत पुन्हा सहभागी होऊ शकतो. - भविष्यात पात्र श्रेणीत नवे सदस्य qकवा वर्तमानात असे पात्र व्यक्ती जे याआधी योजनेत सहभागी झालेले नाहीत qकवा ज्यांनी आपले प्रिमीयम भरणे बंद केले होते, ते पुन्हा निरोगी असल्याचे स्व-प्रमाणपत्र दाखल करून योजनेत सहभागी होऊ शकतात. लाभ : कोणत्याही कारणाने विमाधारकाचा मृत्यू झाल्यास दोन लाख रुपये देय राहतील. प्रीमियम : प्रति सदस्य प्रति वर्ष ३३० रुपये ! या योजनेअंतर्गत देण्यात आलेल्या पर्यायांनुसार, प्रिमीयम एकमुश्त ‘स्वत:नामेङ्क सुविधेच्या माध्यमातून खातेधारकाच्या बचत खात्यातून वार्षिक विमा अवधीच्या ३१ मे qकवा त्याआधी कापून घेण०यात येईल. ३१ मेनंतर संभावित कव्हरसाठी विलंबित नामांकन पूर्ण वार्षिक प्रिमीयम भरण्यासह निरोगी असल्याचे स्व-प्रमाणपत्र दाखल केल्यास शक्य आहे. वार्षिक दावा अनुभवाच्या आधारे प्रिमीयमची समीक्षा केली जाणार आहे. अनपेक्षित प्रतिकूल परिणामांशिवाय, प्रथम तीन वर्षे प्रिमीयमच्या रकमेत वाढ न करण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले जाणार आहेत. - पात्रतेच्या अटी : क. सहभागी बँकांच्या बचतखाते धारकांपैकी ज्याचे वय १८ वर्षे पूर्ण पासून ५० वर्षे (जन्मदिनाच्या जवळपासची दिनांक) यादरम्यान आहे. शिवाय, जो वरिल साधनाच्या रूपात योजनेत सहभागी होण्यासाठी / स्वत:नामे सहमती देणाèया नागरिकाला योजनेत सहभागी करून घेता येईल. - ख. जी व्यक्ती प्रारंभिक नामांकनाच्या अवधीनंतर, ३१ ऑगस्ट २०१५ qकवा ३० नोव्हेंबर २०१५ पर्यंतच्या विस्तारित अवधीत, ज्याप्रमाणे ते प्रकरण असेल त्याप्रमाणे, योजनेत सहभागी होत आहेत. त्यांना निरोगी असल्याचे आणि कोणत्याही गंभीर आजाराने ग्रस्त नसल्याचे घोषणापत्रात उल्लेख केल्याप्रमाणे स्व-प्रमाणपत्र द्यावे लागेल. मास्टर पॉलिसी धारक : योजनेत सहभागी बँक मास्टर पॉलिसी धारक असतील. सहभागी बँकेसोबत चर्चा केल्यानंतर जीवन विमा निगम/अन्य विमा कंपनीद्वारे एका सरळ-सोप्या आणि ग्राहकाला अनुकूल प्रशासन आणि दाव्यांच्या निपटाèयाच्या प्रक्रियेला अंतिम रूप देण्यात येणार आहे. आश्वासनाची समाप्ती : खालीलपैकी कोणत्याही घटनेमुळे विमाधारकाचे कव्हर संपुष्टात येईल आणि त्याला कोणताही लाभ देय राहणार नाही. क. कव्हरधारकाचे वय ५५ वर्षे (जन्मदिनाच्या जवळचा दिवस) होण्यापर्यंत वार्षिक नविनीकरण झाले पाहिजे. वयाची ५० वर्षे पूर्ण झाल्यानंतर मात्र योजनेत सहभागी होता येणार नाही. ख. बँकेतील खाते बंद झाल्यास qकवा खात्यात विमा कव्हर कायम ठेवण्यासाठी पुरेसा निधी नसल्यास ग. जर सदस्याने एलआयसी/अन्य कंपनीसोबत एकापेक्षा जास्त खात्यांच्या माध्यमातून कव्हर घेतले असेल आणि एलआयसी/अन्य कंपनीद्वारे अज्ञातपणे प्रिमीयम मिळत असेल तर विमा कव्हर दोन लाख रुपयांसाठी प्रतिबंधित होईल आणि प्रिमीयम जप्त होण्याचीही शक्यता राहील. घ. जर विमा कव्हर देय तिथीवर कोणत्याही तांत्रिक कारणाने (खात्यात पुरेशी रक्कम नसल्यास qकवा प्रशासकीय मुद्यांमुळे) बंद करण्यात येत असेल तर पूर्ण वार्षिक प्रिमीयम आणि चांगल्या निरोगी आरोग्याविषयीचे प्रमाणपत्र दाखल करून विमा कव्हर पुन्हा सुरू करता येऊ शकते.. ड. सहभागी बँक नियमित नामांकनाच्या बाबतीत प्रत्येक वर्षी ३० जून qकवा त्याआधी तसेच अन्य प्रकरणांमध्ये प्राप्तीच्या महिन्यात प्रिमीयम जमा केले जाईल. प्रशासन : वर दिलेल्या अटींनुसार, ही योजना एलआयसी निवृत्तीवेतन आणि संस्थात्मक समूह योजना qकवा इतर विमा कंपन्यांद्वारे प्रशासित केली जाणार आहे. डाटा प्रवाह आणि माहितीचा अर्ज वेगळ्याने सूचित केले जाईल. खातेधारकांना देय तिथीला qकवा त्याआधी स्वत:नामे प्रक्रियेच्या माध्यमातून पर्यायांनुसार, निश्चित वार्षिक प्रिमीयमच्या वसूलीची जबाबदारी सहभागी बँकेची असणार आहे. योजना लागू असताना सदस्य प्रत्येक वर्षी स्वत:च्या नावे एकदा ‘मँडेटङ्क देऊ शकतात. अर्जाच्या निर्धारीत आराखड्यात नामांकन अर्ज/ स्वत:नामे प्राधिकरण/सहमती घोषणापत्र सहभागी बँकेद्वारे मिळवून ठेवता येईल. एलआयसी/विमा कंपनीच्या प्रस्तुतीकरणाची मागणी करता येऊ शकते. एलआयसी/विमा कंपनी कोणत्याही वेळी या दस्तावेजांची मागणी करू शकते आणि त्याविषयीचे अधिकार त्यांच्याकडे सुरक्षित असतात. प्रिमीयमच्या पावतीला पावतीसह विमा प्रमाणपत्राच्या रूपात जारी केले जाऊ शकते. आवश्यकतेनुसार, वार्षिक आधारावर अंशाकन इत्यादीसाठी योजनेतील अनुभवांचे निरिक्षण केले जाणार आहे. प्रिमीयमची गुंतवणूक एलआयसी)वीमा कंपनीला विम्याचे प्रिमीयम : २८९ रुपये प्रति वर्ष प्रति सदस्य बीसी/मायक्रो/ निर्गमित/अभिकत्र्यांच्या खर्चाची प्रतिपूर्ती : ३० रुपये प्रति वर्षे प्रती सदस्य सहभागी बँकांच्या प्रशासनिक खर्चाची पूर्तता : ११ रुपये प्रति वर्ष प्रति सदस्य या योजनेची प्रस्तावित प्रारंभ तिथी ०१ जून २०१५ होती. यानंतर, वार्षिक नूतनीकरण तिथी प्रत्येक अनुक्रमिक वर्षाच्या एक जून रोजी होईल. जर स्थिती अशी असेल तर या योजनेच्या आगामी नूतनीकरण तिथीपूर्वी बंद करता येऊ शकते. 0 Votes have rated this Naukri. Average Rating is 0